नवी मुंबईकरांना टोलमाफी द्या -आ.मंदा म्हात्रे
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 13, 2023
- 451
नवी मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहत असल्याने ठाण्यातील छोट्या वाहनांना टोलमधून सवलत द्यावी अशी मागणी ठाणेकरांनी केली आहे. याबाबत एमएम-04 नोंदणी असलेल्या वाहनांची आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे एमएच-43 नोंदणीकृत वाहनांनाही टोलमुक्ती देण्याची मागणी स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा टोलच्या मुद्याला हवा देण्याचा प्रयत्न सुरु झाला असून यावेळी तो विरोधकांकडून न होता अप्रत्यक्षपणे सरकारसोबत असलेल्या मनसेकडून होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मुद्यावर ठाकरे यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून ठाणे आणि परिसरातील नागरिकांना टोलमाफी द्यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएच-04 नोंदणी असलेल्या वाहनांची आकडेवारी सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. शिंदे हे ठाण्यातील रहिवाशी असल्याने व पालिकेच्या संभाव्य निवडणुका पाहता निवडणुकीत टोल चे कार्ड खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही तत्काळ मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्र देवून एमएच-43 ची आकडेवारीही मागवून घेवून नवी मुंबईकरांही टोलमाफीतून दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. गेली चार वर्ष आपण नवी मुंबईकरांना टोलमाफी द्यावी अशी मागणी करत असून गेल्या अधिवेशनाही आपण हा विषय लावून धरल्याची प्रतिक्रिया म्हात्रे यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai