नवीन दुय्यम निबंधक कार्यालय खैरणे एमआयडीसीत सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 17, 2023
- 646
नवी मुंबई : राज्य सरकारचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे नवी मुंबईतील कोपरखैरणे स्थिती दुय्यम निबंधक कार्यालय मागील अनेक वर्षापासून जुन्या इमारतीत सुरु होते. त्यामुळे खरेदी विक्री करायला येणाऱ्या नागरिकांना आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता नवीन कार्यालय खैरणे एमआयडीसी परिसरात सुरु करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरखैरणेतील दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार जुन्या इमारतीत सुर असल्याने नागरिकांसह कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करूनही जागेचा शोध सुरू असल्याचे सांगून त्याच जागी काम करण्याची वेळ कर्मचाऱ्यांना आली होती. शेवटी नवीन कार्यालयाला जागा मिळाली असून, हे नवीन कार्यालय खैरणे एमआयडीसी परिसरात एलोरा ओलिओरीस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरू करण्यात आले आहे. सर्व सेवा आणि सुसज्ज अशा कार्यालयाचे उद्घाटन विभागाचे प्रभारी प्रबंधक डी.बी.वळवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या पुढील कामकाज याच कार्यालयात चालणार असल्याचे वळवी यांनी सांगितले. त्यामुळे जुन्या कार्यालयात होणारी गैरसोय यापुढे नागरिकांना होणार नसल्याचेही ते म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai