वाशीत दीपोत्सव साजरा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2023
- 293
हजारो दिव्यांनी उजळला परिसर : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे आयोजन
नवी मुंबई : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे वाशीमध्ये बुधवार, दि. 15 रोजी सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 11,111 दिव्यांच्या प्रकाशाने मिनी सी-शोअरचा परिसर उजळून निघाला होता. हा दीपोत्सव पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
वाशीतील मिनी सी-शोर परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवामध्ये 11,111 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक व भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दीप प्रज्वलित करून या दीपोत्सवाची सुरुवात केली. यावेळी दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला होता. दरम्यान, स्वरसंध्या तसेच संगीत कार्यक्रमानी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद दिली. अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थितांना अल्पोपहारचे वाटप करत होतेच सोबत फलकाच्या माध्यमातून जनजागृतीही करत होते. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ही सहभाग नोंदविला होता. यावेळी अनेक मान्यवरांबरोबर नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai