बेलापुर किल्ला संवर्धनाचे काम सुरु करा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2023
- 371
पुरातत्व विभागाला आदेश देण्याची आ. मंदा म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक ठेवा असलेल्या बेलापूर किल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम सिडकोने 2019 मध्ये सुरू केले होते. दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु चार वर्षापासून हे काम ठप्प असल्याने किल्ल्याचा विकास रखडला आहे. याविषयी आ. मंदा म्हात्रे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन या किल्ल्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश पुरातत्व विभागाला देण्याची मागणी केली.
1560 मध्ये बेलापूर किल्ला बांधण्यात आला. साडेचारशे वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभुमी असलेल्या किल्याला पुर्वी पाच बुरूज होते. त्यापैकी तीन बुरूज पूर्णपणे नाहीसे झाले असून दोन बुरूजांचे अवशेष शिल्लक आहेत. या किल्याचे संवर्धन करावे यासाठी इतिहासप्रेमींनी वारंवार पाठपुरावा केला होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको व शासनाकडे किल्ला संवर्धनासाठी पाठपुरावा केला होता. आमदारांच्या अभ्यासगटालाही पाहणीसाठी बोलावले होते. यानंतर सिडकोने किल्ला संवर्धनाचा निर्णय घेतला. 16 जून 2019 मध्ये प्रत्यक्षात सुशोभीकरणाचे काम सुरू झाले होते. यासाठी 18 कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. सिडकोने सुशोभीकरणाचे काम सुरू केल्यानंतर गडावर भिंतींचे बांधकाम पूर्ण केले आहे. एक वॉच टॉवरही बांधण्यात आला आहे. महानगरपालिका मुख्यालयाबाहेरील बुरूजाचीही दुरूस्ती केली होती. परंतु काही नागरिकांनी बुरूजाला सिमेंट वापरण्यास हरकत घेतली. पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्याच्या नियमावलीप्रमाणे संवर्धन व्हावे अशी भुमीका घेतली. यानंतर विविध कारणांनी संवर्धन व सुशोभीकरणाचे काम बंद झाले आहे. दोन वर्षामध्ये काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. पण चार वर्षानंतरही ते पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम पूर्णपणे ठप्प असून ते पुन्हा सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुरात्तव विभागाने काम करण्याची ग्वाही दिली होती. मात्र आजतागायत कामाला सुरुवात न झाल्याने आ. मंदा म्हात्रे यांनी सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात ही समस्या मांडून लवकरात लवकर बेलापुर किल्ल्याचे काम सुरु करण्याचे आदेश शासनाने पुरात्तत्व खात्याला देण्याची मागणी केली.
- कोणत्या सुविधा मिळणार
बेलापूर किल्ला परिसराचे पर्यटनस्थळामध्ये रूपांतर केले जाणार आहे. या ठिकाणी ॲम्फी थिएटर, फूड कोर्ट, टेहळणी बुरूज, पार्किंग, सुसज्ज आसनव्यवस्था, विरंगुळा केंद्र, ऑडीओ व्हिडीओ व चित्र रूपाने किल्याचा इतिहास सांगणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची काम प्रस्तावित आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai