सुरक्षिततेसाठी भुयारी मार्गाची गरज
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2023
- 450
आमदार मंदा म्हात्रे यांची अधिवेशनात मागणी
नवी मुंबई : महापालिका मुख्यालयासमोरील बेलापूर किल्ला-उरण हायवे येथे उड्डाणपूल असून गावातील असंख्य नागरिक उरण व वाशी येथे कामानिमित्त जाण्याकरिता त्या रस्त्याचा वापर करतात. रस्ता ओलांडतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा यासाठी बेलापूर किल्ला-उरण हायवे येथील उड्डाणपुलाखालून भुयारी मार्ग बांधण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला सूचित करावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली.
बेलापूर किल्ला ते उरण हायवे येथील उड्डाणपुलाखालून हलक्या वाहनांसह मालवाहू जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. स्थानिकांना कामानिमित्ताने ये-जा करताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना अनेक वेळा अपघात घडले आहेत. यामुळे सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा यासाठी बेलापूर किल्ला ते उरण हायवे पुलाखालून भुयारी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या भुयारी मार्गाचा महिला, ज्येष्ठ नागरिकांसह वाशी येथे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेला द्यावेत असे त्या म्हणाल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai