पालिका आंतर विभाग पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 28, 2023
- 362
नवी मुंबई ः पालिकेच्या वतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधून पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता आंतरविभाग कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध क्रीडा प्रकारांसह क्रिकेटच्याही स्पर्धांचा समावेश होता. यातील पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पालिकेच्या विविध विभागांतील 38 संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. तर महिला विभागासाठी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेचा शुभारंभ मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या हस्ते, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेत उपांत्य फेरीची लढत अग्निशमन विभाग विरुध्द कोपरखैरणे विभाग यांच्यात अटीतटीची झाली. यामध्ये कोपरखैरणे विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 16 धावा केल्या. अग्निशमन विभागास विजयासाठी असलेली 17 धावांची त्यांनी 7 चेंडू राखून पूर्ण करीत विजयश्री मिळविली व ते अंतिम फेरीत दाखल झाले. दुसरी उपांत्य फेरी आपती व्यवस्थापन विभाग विरुध्द वाहन चालक यांच्यामध्ये होऊन वाहनचालक संघाने 6 धावांनी विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष क्रिकेटची अंतिम फेरी अग्निशमन विभाग व वाहन चालक यांच्यात होऊन अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये अग्निशमन विभागाने दिलेले 36 धावांचे आव्हान वाहन चालक संघाला पूर्ण करता येऊ शकले नाही. वाहनचालक संघाला 20 धावांमध्ये रोखत 16 धावांनी विजय संपादन करत अग्निशमन विभागाने अंतिम विजेतेपद पटकावले. अशाच प्रकारे महिला विभागासाठी घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये उपांत्य फेरीत माध्यमिक शिक्षक विभाग विरुध्द समाजविकास विभाग यांच्यामध्ये लढत होऊन समाजविकास विभागाने 22 धावांचे दिलेले लक्ष्य माध्यमिक शिक्षक विभाग संघाला पूर्ण करता येऊ शकले नाही. त्यांना 17 धावांवर रोखत समाजविकास विभाग 05 धावांनी विजयी झाला. दुसरी उपांत्य फेरी शहर अभियंता विभाग विरुध्द शिक्षण विभाग यांच्यामध्ये होऊन या चुरशीच्या सामन्यात शिक्षण विभागाने 2 धावांनी विजय संपादन केला.
महिला क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत विजयी झालेल्या शिक्षण विभाग व समाजविकास विभाग या दोन्ही संघांच्या अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत समाजविकास विभाग संघाला 31 धावांमध्ये रोखत शिक्षण विभाग संघाने 02 धावांनी विजय संपादन केला व महिला क्रिकेटचे अंतिम विजेतेपद पटकावले. पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात संपन्न झाल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai