‘त्या' सोडतधारकांना फोन केला तर दलालांना चोपून काढू; मनसेचा इशारा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 03, 2024
- 347
नवी मुंबई : सिडकोच्या उलवे, बामणडोंगरी येथील घरांच्या किमती जास्त असल्याने ती कमी करुन परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी अनेक सोडतधारकांसह मनसेचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिडकोने 6 लाख कमी कमी केले आहेत. मात्र यापुर्वी किमंत जास्त असल्याने घर नाकारलेल्यांना सिडकोने पुन्हा संधी द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच काही दलाल/एजंट घर परत केलेल्या 1300 कुटुंबांना फोन करून 2 ते 2.5 लाख द्या, तुम्हाला घर मिळवून देतो अशी मागणी करत आहेत. यापुढे जर सोडतधारकांना असे फोन गेले, तर दलालांना चोपून काढू असा इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
उलवे व बामणडोंगरी येथील 7849 घरांसाठी सिडकोने दोन वर्षांपूर्वी सोडत काढली होती. मात्र घरांचे क्षेत्रफळ, भवतालच्या सुविधा यांच्या तुलनेत सिडकोने घरांसाठी ठरवलेले 35 लाखाचे मूल्य अधिक असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. परंतु सिडकोकडून दखल घेतली जात नसल्याने सुमारे 1300 लाभार्थींनी पात्र ठरवूनही घर नाकारले होते. तर उर्वरित लाभार्थींनी घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. दरम्यान मनसेने त्यांना साथ देत सिडको विरोधात मोहीम उभारली होती. अखेर सिडकोने या घरांच्या किमती सुमारे 6 लक्ष कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गोरगरीब सिडको सोडतधारकांचे जवळपास 480 कोटी रुपये वाचले आहेत.
7,849 सिडको सोडतधारकांपैकी 1300 सोडत धारकांनी महागडी घरे परवडत नसल्याने घर सिडकोला परत केले होते. आता घरांच्या किंमती 27 लाख इतक्या कमी झाल्या आहेत. तरी या 1300 सोडतधारकांना संधी देण्यात यावी व त्यांना घरापासून वंचित ठेवू नये अशी मागणी सिडको कडे केली आहे. सिडको मधील अधिकाऱ्यांशी संगनमत असणारे काही दलाल/एजंट घर परत केलेल्या 1300 कुटुंबांना फोन करून 2 ते 2.5 लाख द्या, तुम्हाला घर मिळवून देतो अशी मागणी करत असल्याचे त्यांनी नमुद केले. यापुढे जर सोडतधारकांना असे फोन गेले, तर दलालांना चोपून काढू असा इशारा गजानन काळे यांनी दिला. तसेच या दलालांच्या आड असणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सिडको व्यवस्थापकीय संचालकांकडे केली. तसेच सिडको सोडतधारकांना जे वाटप पत्र देण्यात येईल, ते (किमान 50 ते 100 प्रतिनिधिक स्वरूपात) राजसाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात यावे अशी मागणी मनसेने केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai