पालिकेचा 4950 कोटींचा अर्थसंकल्प सादर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2024
- 490
कोणतीही करवाढ नाही; आरोग्य सुविधांवर भर
नवी मुंबई ः महानगरपालिकेचा सन 2023-24 चा सुधारित आणि सन 2024-25 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला. 1377.68 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह जमा रु.4950 कोटी व रु.4947.30 कोटी खर्चाचे आणि रु.2.70 कोटी शिलकेचे पालिकेचे सन 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला असून प्रशासकीय सेवा गतिमान करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महापालिका आयुक्तांकडे सादर केली. जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1547.60 कोटी व जमा रू. 3238.58 कोटी अशी मिळून एकत्रित जमा रु. 4786.18 कोटी आणि रु. 3408.50 कोटी खर्चाचे सन 2023-24 चे सुधारित अंदाज, तसेच रू. 1377.68 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह जमा रु.4950 कोटी व रु.4947.30 कोटी खर्चाचे आणि रु.2.70 कोटी शिलकेचे पालिकेचे सन 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच यावर्षीही अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. मात्र त्याचा जराही परिणाम शहरातील विकासकामांवर होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने महापालिका महसूलात वाढ होण्यासाठी नवीन साधनस्त्रोतांचा शोध घेऊन त्याची फलनिष्पत्ती करण्यावर भर राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आरोग्य, शिक्षणास प्राधान्यक्रम देतानाच स्वच्छता, पर्यावरण, वाहतुक सुविधा, लोककल्याणकारी योजनांवर भर देण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
आयुक्तांनी मंजुर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य सुविधांवर भर दिला आहे. यामध्ये नागरिकांसाठी मायक्रोबायोलॉजी नवीन प्रस्तावित एमआयसी/ई-हॉस्पिटल, पदव्युत्तर वैद्यकीय संस्था, मेमोग्राफी सुविधा, कॅथलॅब व आयसीयु सुविधा, एमआरआय सुविधा, मॉड्युलर ओटी अशा अत्याधुनिक सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
कार्यालयीन कामकाजातही ई-गव्हर्नन्स् प्रणालीचा प्रभावी वापर केला जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित कामे अधिक सुलभरितीने, गतीमानतेने व पारदर्शकपणे होतील व यामधून ‘लोकाभिमुख प्रशासन' अशी नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा अधिक उंचावेल असा विश्वास हा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करताना आयुक्तांनी व्यक्त केला. मागील वर्षामधील अंदाजपत्रकात असलेल्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा साकल्याने विचार करून नवी मुंबईकर नागरिकांच्या संकल्पनेतील शहर आकारास यावे याकडे हे अंदाजपत्रक सादर करताना विशेष लक्ष देण्यात आलेले आहे.
सन 2024-25 करिता जमा संकल्प
- सन 2024-2025 या आर्थिक वर्षात महसूली जमा रु.3304.69 कोटी एवढी अंदाजित धरली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता संबंधित विभाग सर्वतोपरी प्रयत्न करतील. नवीन आर्थिक वर्षात कोणतीही करदर वाढ सूचविण्यात आलेली नाही. तथापि, विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याकरिता उत्पन्न वाढ होणे आवश्यक आहे.
- सन 2024-25 करिता विकास कामांवरील भांडवली खर्चाकरिता आगामी आर्थिक वर्षामध्ये रु.2191.67 कोटी एवढा निधी ठेवण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai