लोटस तलावाला डेब्रिजचा विळखा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 16, 2024
- 409
नवी मुंबई : कमळ फुलांनी सदैव बहरलेल्या असणाऱ्या नेरुळ, सीवूडस सेक्टर-27 मधील लोटस तलावात डेब्रिज टाकण्याचे काम सुरु आहे. यामुळे संपूर्ण तलावाची रया गेली असून, तलाव भकास होत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच या तलावाचे संवर्धन न केल्यास भविष्यात लोटस तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
शहरातील नैसर्गिक संपदा, पाणथळ, कांदळवन यांचे जतन-सरंक्षण-संवर्धन करण्याऐवजी या जागांवर पालिकेने रहिवाशी आरक्षण टाकून नवी मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहेच. आता पालिका व सिडको यांच्या दुर्लक्षपणामुळे उरले सुरले तलाव देखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नेरुळ, सीवूड सेक्टर-27 स्थित लोटस तलावात डेब्रिज टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. याशिवाय पूर्वी कमळाच्या फुलांनी बहरत असलेल्या तलावाच्या ठिकाणी शिंगाड्याची अनधिकृत शेती केली जात असल्याचे उघडपणे दिसते आहे. आता तर तेथे डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. तसेच या तलावाच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असून देखील नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासन या तलावातील नैसर्गिक संपदेला हानी पोहचवली जात असताना केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका आणि सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले तर येत्या काही दिवसात लोटस तलाव नामशेष होण्याची शवयता पर्यावरणप्रेमी वर्तवित आहेत.
लोटस तलावाला डेब्रिजचा, कचऱ्याचा, जंगली झुडपांचा पडलेला विळखा दूर करण्यासाठी लोटस तलावाची स्वच्छता तातडीने करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर भविष्यात तलावाला भूमाफियाच्या माध्यमातून हानी पोहचली जाऊ नये यासाठी तलावाभोवती जाळीचे कंपाउंड बांधून त्याच्या बाहेरील बाजूला वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याची तसेच तलावाभोवती विद्युत पोल बसवून कोणतीही हानी न पोहचवता तलावाचे सुशोभिकरण तातडीने करण्याची गरज आहे. - सुधीर दाणी, सदस्य - सजग नागरिक मंच, नवी मुंबई.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai