मतदार राजा जागा हो..
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2024
- 548
जन जागृती पंधरवडा उत्साहात संपन्न
नवी मुंबई ः शिरवणे व वाशी गटातील नवी मुंबई महानगर पालिका व खाजगी शाळांमध्ये नुकताच मतदार राजा जागा हो हा जन जागृती पंधरवडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केंद्र प्रमुख सागरनाथ भंडारी व केंद्र प्रमुख प्रशांत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती अभियानात इयत्ता पाचवी ते आठवीच्या सुमारे तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका रंजना साळी यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्र.15 शिरवणे या शाळेतही शाळा स्तरावर मतदार राजा जागा हो या विषयावर जनजागृती पर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मतदार फेरी, विद्यार्थ्यांचे पालकांस पत्र आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृत पाटील नेरुळकर लिखित मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या पथनाट्याचे हरिश ऐनकार, बाळू डुकरे, शरद फटांगरे, नमिता भोईर, मंदा दहिफळे, समिधा नाईक शाळेतील आदी शिक्षकांनी चौका चौकात प्रयोग करुन प्रबोधन केले. या प्रयोगासही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाविषयी माहिती देताना केंद्र प्रमुख सागरनाथ भंडारी म्हणाले की, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करीत असतो. मतदार जनजागृती पंधरवडा अभियान हा या उपक्रमांचाच एक भाग होता. शाळा स्तरावर राबविण्यात आलेल्या या अभियानासही विद्यार्थी, शिक्षक, पालक या बरोबरच येथील नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. हे या उपक्रमाचे फार मोठे फलित आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai