पाचगणीत रंगणार 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2024
- 438
नवी मुंबई ः पाचगणी येथे 8 जून शनिवारी 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत खारेगाव ते बेलापूर पट्टीतील सुमारे 1200 खेळाडू सहभागी होणार असल्याचे 40+ मास्टर क्रिकेटर्स असोसिएशन यांनी सांगितले आहे.
एकेकाळी क्रिकेटची मैदाने गाजवलेले नवी मुंबईतील आजी माजी क्रिकेटपटू पाचगणी येथे मैदानावर खेळताना दिसणार आहेत. 40+ मास्टर क्रिकेटर्स असोसिएशन यांच्या वतीने गेली 20 वर्षे खारेगाव ते बेलापूर पट्टीतील गावामध्ये 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षी बेलापूर ते खारेगाव पट्टीतील एकूण 24 आगरी-कोळी संघ पाचगणी येथे खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शनिवार 8 जून रोजी सकाळी 8 वाजता पाचगणी येथिल संजीवनी शाळेच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होईल आणि रविवार 9 जुन रोजी दुपारी 4 वाजता बक्षिस वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. या स्पर्धेत क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन 40+ मास्टर क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता 40+ मास्टर क्रिकेटर्स असोसिएशन नवी मुंबईचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष नरेश गौरी, सचिव एल डी पाटील,सहसचिव विकास मोकल, खजिनदार मनोज म्हात्रे तसेच इतर पदाधिकारी खेळाडू मेहनत घेतली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार आहेत.े
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai