एपीएमसीमधील सर्व इमारतींचे संरचना परीक्षण करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2024
- 381
नवी मुंबई पालिकेची नोटीस; कांदा बटाटा बाजारासह मॅफको धोकादायक
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा बाजार, मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारत व मॅफको मार्केट धोकादायक घोषित केले असून इतर मार्केट 30 वर्षापेक्षा जुने झाले असल्याने इमारतींचे संरचना परीक्षण करा अशी नोटीस नवी मुंबई महापालिकेने एपीएमसीला बजावली आहे.
सन 1982 साली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तुर्भे येथील सिडकोच्या 175 एकर जागेत वसवण्यात आली आणि अल्पावधितच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ निर्माण झाली, मात्र या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी छताचा भाग कोसळतो तर माल धक्के तुटले, धक्यांच्या वरील भागातील प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना घडतात. इमारतीला खांबाना तडे जाण्यास सुरुवात झाली. नवी मुंबई महापालिकेने सर्व प्रथम 2005 साली येथील कांदा बटाटा बाजारातील इमारती धोकादायक घोषित केल्या, तर मसाला मार्केट मधील मध्यवर्ती सुविधा इमारत व मॅफको मार्केट इमारत देखील धोकादायक घोषित करण्यात आले आहे. येथील गाळे धारकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने यंदा देखील या व्यापाऱ्यांना आपला जीव मुठीत धरूनच व्यवसाय करावा लागणार आहे. या इमारती पडून काही दुर्घटना घडल्यास त्याच नवी मुंबई महानगर पालिका जबाबदार राहणार नाही अशा सूचना नवी मुंबई महानगर पालिकेने दिल्या आहेत. मागील अनेक वर्षापासून या इमारती आहेत धोकादायक घोषित करून देखील बाजार समितीने व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने येथील व्यापाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून व्यवसाय करावा लागत आहे.
- मागील वर्षी घडल्या दोन दुर्घटना
नवी मुंबई महानगर पालिकेने धोकादायक घोषित केलेल्या बाजार समितीतील कांदा बटाटा बाजारातील एफ गल्लीत मागील वर्षी 17 जुलै 2023 रोजी गाळ्याचा सज्जा कोसळला होता. मात्र ही घटना रात्री आठ वाजता घडली होती. त्यामुळे त्या ठिकाणी कोणती जीवित हानी झाली नाही. त्यानंतर पालिकेने सदर बाजार रिकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्यायी जागा नसल्याने गाळे खाली करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. तसेच 22 नोव्हेंबर 2023 रोजी धान्य बाजारातील वाय गल्लीत सज्जा/छताचा काही भाग पडल्याची घटना घडून दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.
शहरातील 30 वर्ष जुन्या इमारतींचे तज्ञ वास्तू विशारद कडून तसेच नामांकित परीक्षण संस्थांकडून संरचना परीक्षण करून त्याचा अहवाल नवी मुंबई महानगर पालिकेकडे सादर करावा. तसेच अहवालात दुरुस्ती अथवा पाडकाम बाबत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार एपीएमसी बाजार समितीला वारंवार पत्र देऊन देखील बाजार समितीने येथील इमारतींचे संरचना परीक्षण केलेले अहवाल दिलेले नाहीत. -भरत धांडे, तुर्भे विभाग अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai