स्वच्छताविषयक कामांसाठी ‘पालक अधिकारी\'
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 22, 2024
- 245
शहर स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक लोकसहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शाळा व महाविदयालयीन विदयार्थी यांच्यासह त्यांच्या पालकांपर्यंत स्वच्छता संदेशाचे प्रसारण होण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यवाही करावी असे सूचित केले. स्वच्छतेची कार्यवाही नियमीतपणे होण्यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकाऱ्यांनी त्या विभागाचे स्वच्छताविषयक पालक अधिकारी म्हणून काम पाहावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांचा बारकाईने आढावा घेताना आयुक्तांनी स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असल्याने ती अधिक उंचावणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले व या कामी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले. स्वच्छतेची कार्यवाही नियमीतपणे योग्य रितीने होण्यासाठी व त्यावर त्रयस्थ यंत्रणेचे निरीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी विभागप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून या अधिकाऱ्यांनी त्या विभागाचे स्वच्छताविषयक ‘पालक अधिकारी' म्हणून काम पाहावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबईतील शाळा महाविदयालयामध्ये शिकणारी मुले व युवक हे आपल्या शहराचे भविष्य असल्याने स्वच्छता अभियानात त्यांना मोठया प्रमाणावर सक्रिय सहभागी करुन घेणे. कचऱ्याचे घरापासूनच वर्गीकरण केले जाण्यावर व तो घंटागाडीत वेगवेगळा दिला जाईल अशी दक्षता घ्या. इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा ई-कचरा संकलित करण्यासाठी ठराविक दिवस निश्चित करावा आणि तो जाहीर करुन त्यादिवशी ई-कचरा संकलन मोहीम नियमीतपणे राबवावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
- कापडी पिशव्यांच्या वेंडींग मशिन बसवा
शैक्षणिक संस्थांना त्यांच्या परिसरातील रस्ते, मार्केट स्वच्छतेच्या दृष्टीने दत्तक दयावेत अशीही अभिनव संकल्पना राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले. पालिका क्षेत्रातील मार्केट्स तसेच सोसायटया प्लास्टिकमुक्त असाव्यात यादृष्टीने कृती आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दयावा असे स्पष्ट करतानाच मार्केटमध्ये नागरिकांसाठी कापडी पिशव्यांच्या वेंडींग मशिन बसवाव्यात असे आयुक्तांनी स्पष्ट केले. - शौचालये स्वच्छ ठेवा
प्रत्येक विभागातील यलो स्पॉट्स शोधून त्याठिकाणी तत्परतेने स्वच्छतागृहे उभारावीत तसेच उदयाने, बसडेपो, मार्केट याठिकाणची स्वच्छतागृहे नियमीत स्वच्छ व निटनेटकी राहतील आणि त्याठिकाणी स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन व परिसर येथील स्वच्छतागृहेही, सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालये स्वच्छ व सुस्थितीत असतील याची काटेकोर काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश देत यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले. - आवारातच कचऱ्याची विल्हेवाट प्रकल्प राबवा
दैनंदिन 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटयांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबविणे गरजेचे असून त्यादृष्टीने कार्यवाही करावी व अशा सर्व सोसायटया याची अंमलबजावणी करतील याकडे काटेकोर लक्ष दयावे असे निर्देश् आयुक्तांनी दिले. अशाच प्रकारे 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या हॉटेल्सकडूनही असे प्रकल्प राबविण्याची कार्यवाही करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले. - शिल्पाकृतींच डागडुजी करा
झिरो वेस्ट स्लम, ड्राय वेस्ट बँक, फिश फेड या नाविन्यपूर्ण उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याबाबतही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. शहर सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या शिल्पाकृती, कारंजे यांची आवश्यक डागडुजी व सफाई त्वरीत करुन घ्यावी तसेच ओल्या व सुक्या कचऱ्याचे रस्त्यांवर लावण्यात आलेले डस्टबिन सुस्थितीत करुन घ्यावेत असेही निर्देशित करण्यात आले. - सफाई मित्रांसाठी
सफाई मित्रांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड, अटल पेन्शन योजना, त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा योजना राबविण्याचेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai