नैना क्षेत्रात विणणार रस्त्यांचे जाळे
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2024
- 476
तीन हजार 476 कोटींच्या निविदा जाहीर
पनवेल : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील (नैना प्रकल्प) पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सिडको महामंडळाने पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सिडकोने नैना प्रकल्पातील 8 ते 12 क्रमांकाच्या नगर नियोजन योजनेतील 20 मीटर आणि त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते बांधणीसाठी 3 हजार 476 कोटी रुपयांच्या निविदा जाहीर केल्या.
नैना क्षेत्राला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात रस्त्यांसह इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नैनाचा पायलट प्रकल्प आणि 23 गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात 12 नगररचना परियोजना (टीपीएस) प्रस्तावित आहेत. त्यापैकी नगररचना परियोजना क्रमांक 2,3.3.4.5.6 आणि 7 अंतर्गत प्रस्तावित असणाऱ्या रस्ते, पदपथ, पावसाळी पाण्याची गटारे आदी विकासकामांसाठी 3114 कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकीय किमती एवढ्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यांचे आर्थिक देकार नुकतेच उघडण्यात आले असून, लवकरच या विकासकामांना सुरुवात होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ आता नगररचना परियोजना क्रमांक 8, 9, 10, 11 आणि 12 मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 3300 कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या विभागातील अंतर्गत रस्ते, मलवाहिन्या आणि पदपथांच्या कामासाठी सिडकोने 1200 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच 3,114 कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत तर आता 3300 कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मागविले आहेत.
सर्व निविदा प्रक्रिया वेळीच पार पडल्यास पुढील पाच वर्षांत नैना क्षेत्रात टप्प्याटप्प्याने रस्ते बांधण्यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांची कामे सिडको हाती घेण्याच्या प्रक्रियेला सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी गती दिली आहे. नैना प्रकल्पातील रस्ते बनविताना कमीत कमी सिग्नल यंत्रणेविना रस्ते बांधले जाणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai