पुनर्वसित भूखंडांवर बांधकाम सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 15, 2020
- 793
नवी मुंबई ः आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणार्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना सर्वोत्तम अशा 22.5% व पुनर्वसन व पुनःस्थापना पॅकेजअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. बहुतांश प्रकल्पबाधितांना सदर भूखंडांवर बांधकाम सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली असून या प्रकल्पबाधितांनी त्या अनुषंगाने आपल्या भूखंडांवर बांधकाम करण्यास सुरुवातही केली आहे.
बांधकाम परवाना मिळवण्यासाठीची प्रक्रीया अतिशय सुलभ असून ती सहज समजण्यासारखी आहे. विमानतळ प्रकल्पबाधितांना त्यांचे बांधकाम तातडीने सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी लवकरात लवकर मिळणे आवश्यक असल्याने सिडको महामंडळ सदर बांधकाम परवाने प्रकल्पबाधितांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रकल्पबाधितांनी त्यांना प्राप्त झालेल्या भूखंडांवर ज्या प्रमाणात बांधकाम करायला सुरुवात केली आहे, त्यावरून हे एक सर्व सोयी-सुविधांनी युक्त, नियोजनबद्ध व स्वयंपूर्ण असे नगर निर्माण होणार यात शंका नाही. त्याचबरोबर विमानतळ प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू असून सभोवतालच्या परिसराचा कायापालट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पाला जेव्हा मूर्त स्वरूप प्राप्त होईल, तेव्हा तर सभोतालच्या परिसरासोबतच प्रकल्पबाधितांच्या या नगरालादेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होईल.
या बांधकामांसाठी प्रकल्पबाधितांना रु. 1000/- प्रति चौ. फूट बांधकाम अनुदान दिले जात आहे. याशिवाय प्रकल्पबाधितांना रु. 500 प्रति चौरस फूट प्रोत्साहन भत्ता व 18 महिन्यांचे घर भाडे देण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai