पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2024
- 407
आमदार गणेश नाईक यांचा पालिका प्रशासनाला इशारा
नवी मुंबई ः ऐन पावसाळ्यात नवी मुंबईतील विविध भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेचे स्वतःचे धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असतानाही पाणी पुरवठा खंडीत होत असल्याप्रकवणी आमदार गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केला. तसेच पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर लोकशाही मार्गाने जळजळीत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
नवी मुंबईच्या विविध प्रश्नांवर लोकनेते आमदार नाईक यांची 84वी बैठक महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याबरोबर मंगळवारी पार पडली. त्याप्रसंगी त्यांनी जनतेच्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडून त्या तत्परतेने सोडविण्याची सूचना केली. या बैठकीमध्ये आमदार नाईक यांनी पाणीटंचाईच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडत दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सर्वच भागात नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होत असल्याचे सांगितले. यंदा मोरबे धरण काठोकाठ भरले असताना देखील पाणीपुरवठा अनियमित होतो आहे. प्रशासकीय कालावधीमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे नवी मुंबईला दैनंदिन किती पाणीपुरवठा होतो, आपल्या स्त्रोतामधून किती पाणीपुरवठा होतो तसेच मोरबे धरणातून अन्यत्र कुठे पाणीपुरवठा केला जातो? याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मागवल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाहीतर प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
- स्वतःचे धरण असूनही नवी मुंबई तहानलेली हे नवी मुंबईचे दुर्भाग्य- संदीप नाईक
स्वतःचे धरण असूनही नवी मुंबई तहानलेली आहे हे नवी मुंबईचे दुर्भाग्य असल्याची नाराजी संदीप नाईक यांनी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन ढिसाळ असून याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावर आयुक्तांनी ताबडतोब संबंधित विभागात जाऊन पाणीटंचाईची समस्या जाणून घेत त्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. - कोस्टल रोडला विरोध
बेलापूरच्या अंतर्गत भागातून पुढे खारघर कडे जाणाऱ्या कोस्टल रोडला आपला विरोध असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. बाहेरून जाणारा हा मार्ग अचानक बदलून सिडकोकडून बेलापूरच्या अंतर्गत सेक्टर 15 मधून जाण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या रोडसाठी अनेक झाडांचा बळी देखील जाणार आहे. आम्ही बेलापूरची शांतता भंग होऊ देणार नाही. कोस्टल रोडला आमचा विरोध राहील, असे आमदार नाईक म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai