Breaking News
उरण ः समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचा उरण येथे पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या बिपिन मरीन या सर्व्हेअर कंपनीसोबत करार नुकताच संपन्न झाला. संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते अतुल परशुराम भगत यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच बिपिन मरीन तर्फे भूषण हांडे साहेब यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार तीन वर्षासाठी वेतन वाढ तसेच व्यतिरिक्त प्रत्येक कामगारांना वैद्यकीय मदत म्हणून भत्ताही मिळणार आहेत.
केंद्रीय कामगार कायद्याप्रमाणे वेतन तसेच कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी चांगली वैद्यकीय सुविधा या प्रमुख मागण्या आम्ही या करारामध्ये कंपनीकडून मागून घेण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे अतुल भगत यांनी सांगितले. या करारानुसार तीन वर्षासाठी 9200 रुपयांची भरगोस वेतन वाढ तसेच व्यतिरिक्त प्रत्येक कामगारांना वैद्यकीय मदत म्हणून 5000, 5500, 6000 रुपये पुढील तीन वर्षात मिळणार आहेत. याप्रसंगी पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क कंपनी प्रशासनातर्फे अरुप घोष, सागर म्हात्रे आदी उपस्थित होते. तसेच कामगार संघटनेतर्फे अजय पाटील, नैनेश म्हात्रे तसेच कामगार प्रतिनिधी म्हणून राकेश भोईर, तुषार पाटील, शक्ती भोईर, निलेश मोडखळकर, लकेश ठाकूर, विशाल ठाकूर, अभिजीत घरत, सुलक्षण ठाकूर तसेच बिपिन मरीन सर्व्हिसेस तर्फे भूषण हांडे, अक्षय ठाकूर उपस्थित होते. कामगार प्रतिनिधींचे मिळालेले सहकार्य तसेच सर्व कामगारांचा संघटनेवर असलेला विश्वास यामुळेच हा करार संपन्न होऊ शकला. या पुढील होणारे करार होण्यासाठी सदर झालेला करार महत्त्वाचा ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai