आंध्र कॉर्पोरेशनकडून पालिकेच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे कौतुक
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 24, 2024
- 448
नवी मुंबई ः देशापरदेशातून विविध तज्ज्ञ तसेच अभ्यासक नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांना भेटी देत असतात. याच धतवर आंध्रप्रदेश राज्यातील स्वच्छ आंध्र कॉपोरेशनच्या उच्च अधिकारीवर्ग अभ्यासगटाने नवी मुंबई महापालिकेस भेट देत घनकचरा व मलनि:स्सारण व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली तसेच प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रणालीचे कौतुक केले.
नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत केले तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. या अभ्यासगटातील वरिष्ठ पदाधिकारी के.पत्ताभिराम, स्वच्छ आंध्र कॉर्पेोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बी..अनिलकुमार रेड्डी, महापालिका आयुक्त डी.दसरध रामी रेड्डी, उप कार्यकारी अभियंता के.सतीश कुमार, वॉश सल्लागार छ.भानुप्रकाश व एम. नागेश्वरा यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, निसर्गोद्यान, कोपरखैरणे येथील मलनि:स्सारण केंद्र व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट तसेच वैशिष्टयपूर्ण आकांक्षी शौचालय आणि इटीसी केंद्र यांना भेटी देऊन प्रशंसा केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai