आ. मंदा म्हात्रे यांचा कार्य अहवाल पंतप्रधानांकडेे सुपूर्द
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 22, 2025
- 514
नवी मुंबई : गत आठवड्यात पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी 151 बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत केलेल्या 5 वर्षाचा विविध विकास कामांचा “कार्य अहवाल” मोदीजी यांना सुपूर्द केला. तसेच नवी मुंबईतील विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.
नवी मुंबईकरांशी माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण नवी मुंबईकरांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केलं, व त्यांनी मला सन्मान मिळवून दिला, प्रतिष्ठा मिळवून दिली ते मी कधीही विसरणार नाही. आजपर्यंत मला नवी मुंबईच्या नागरिकांसाठी, त्यांच्या सुखमय जीवनासाठी जी काही सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचे मी सोनं केल आहे. गतवेळी सांगितल्या प्रमाणे मी विविध विकास कामे पूर्णत्वास नेली असून त्याचे लोकार्पण ही झाले आहेत व काही मागही लावली आहेत. तसेच मी व्यक्तिगत आश्वासनावर व घोषणावर विश्वास ठेवत नाही. परंतु सर्वसामान्य जनतेसाठी जे काही विकासाचे कार्य केले आहे त्याचे आपण सर्व नवी मुंबईकर साक्षीदार आहात. यापुढे नवी मुंबईचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय राहणार असल्याचे आ.मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai