धारण तलावांची क्षमता 25 टक्केच शिल्लक
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2025
- 128
शहरात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता
नवी मुुंबई : शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या होल्डिंग पाँडमध्ये गाळाचे साम्राज्य वाढले असून, खारफुटी बेसुमार वाढली आहे. त्यामुळे या धारण तलावांची क्षमता तब्बल 75 टक्के कमी झाली असून 25 टक्केच शिल्लक राहीली आहे. सानपाडा येथील धारण तलाव 90 टक्के गाळयुक्त झाल्याने पावसाळ्यापुव जर तो साफ झाला नाही तर पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी सिडकोने सविस्तर अभ्यास करून शहरात विविध ठिकाणी 11 ठिकाणच्या खाडीकिनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार केले आहेत. ओहोटी सुरू होताच पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. शहरात पडणारा पाऊस पाहता, पालिकेच्या माध्यमातून पाण्याचा निचरा अधिक होण्यासाठी या होल्डिंग पाँडची क्षमता वाढवून 150 मिमी करण्यात आली होती. या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला आहे. तसेच खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत. होल्डिंग पाँडमधील पाणी उपसण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पंप बसविण्यात आल्या आहेत, परंतु गाळ साचल्याने अनेक अडचणी येत आहेत. गाळ काढण्यासाठी पालिकेकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने काम प्रलंबित आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहत आहे. सीबीडी विभागातील सेक्टर 1, 1 ए, 2, 3, 4, 5, 6, 9, 9 एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी सीबीडी सेक्टर 13 येथील होल्डिंग पाँडमध्ये वाहून जाते. गाळ, बेसुमार वाढलेली खारफुटी, यामुळे 25 जुलै 2024 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पालिकेने नियुक्त केलेली आयआयटी मुंबई चे प्राध्यापक यांच्या पाहणी व अभ्यासात मुख्यत्वे धारण तलावामध्ये गाळ साचल्याने त्यांची धारण क्षमता 75 टक्के इतकी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सानपाडा येथील धारण तलावही 90 टक्के गाळाने भरला आहेे. शहरातील सर्व 11 धारण तलावांची क्षमता वाढविण्याकरिता उपाययोजनाविषयी सर्व तांत्रिक बाबींचे सखेोल अध्ययन करुन अहवाल सादर करण्याकरिता तज्ज्ञ समिती गठित करण्यात आलेली आहे. याबाबतचे तांत्रिक सादरीकरण सदर गठित समितीने पालिकेला सादर केले आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणी आदेशानुसार व महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटी प्राधिकरणाची परवानगी प्राप्त करुन सदर कामे त्वरित हाती घेण्यात येणार आहेत.
- धारण तलावांची स्वच्छता अनेक वर्षांपासून न झाल्याने त्यामध्ये खारफुटी, गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. स्वच्छतेदरम्यान खारफुटी नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जैवविविधतेला कोणतीही हानी न पोहचता ते साफ होणे गरजेचे आहे. तसेच हा विषय उच्च न्यायालयाच्या पटलावर असल्याने न्यायालयाच्या सूचनेनुसार धारण तलावांची स्वच्छता करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai