कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2025
- 546
नवी मुंबई ः महिलांमार्फत विविध कलागुणदर्शनपर कार्यक्रम सादर करीत सुरू झालेला नवी मुंबई महानगरपालिका आयोजित जागतिक महिला दिनाचा विशेष कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृहात जल्लोषात हाऊसफुल्ल गदत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजेच खऱ्या अर्थाने महिलांना सामर्थ्यवान बनविणे असून त्यादृष्टीने महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि महिला बचत गट तसेच महिला मंडळांनी बनविलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फेरीवाला भूखंडांवर हॉकर्स प्लाझा बनवून त्याठिकाणी महिलांना विशेष प्राधान्य द्यावे असे मत महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मॉलमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच एखादी स्वतंत्र इमारत बांधून त्याठिकाणी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजापरेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न व्हावेत अशी सूचना केली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समाजातील महिला व पुरूषांच्या व्यस्त प्रमाणाबद्दल गांभीर्य व्यक्त करीत ही विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येकानेच जागरूक होण्याची गरज व्यक्त केली. महिलांना प्रत्येक बाबतीत समान दर्जा उपलब्ध करून देणे हे आपले ध्येय असले पाहीजे असे मत त्यांनी मांडले.
यावेळी उपस्थित महिला अधिकारी उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, नयना ससाणे, ललिता बाबर, अभिलाषा म्हात्रे, नगरसचिव चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे, विभाग अधिकारी अलका महापूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच करिष्मा शहा यांना महिला उद्योजकता पुरस्कार, शेल्टर असोसिएट्स यांना स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था पुरस्कार, मिनल मंडलिक यांना दिव्यांगांकरिता उत्कृष्ट कार्य करणारी महिला पुरस्कार, सुमन बंडगर यांना उत्कृष्ट माध्यमिक शिक्षिका व रंजना साळी यांना उत्कृष्ट प्राथमिक शिक्षिका पुरस्कार, करूणा कोटकर यांना विनावेतन काम करणाऱ्या समाजसेविका पुरस्कार तसेच ललिता जितेकर यांना उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्यासोबतच उत्कृष्ट महिला आशा सेविका म्हणून अनिसा शेख (बेलापूर),प्रतिक्षा पांचाळ (नेरूळ), गीता कदम (वाशी), संध्या आतकरी (तुर्भे), सुषमा फुलमाळी (कोपरखैरणे), शुभांगी देवकर (घणसोली),सविता सुंबे (ऐरोली), सुशिला कोकणे (दिघा) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच लता पड्याची (बेलापूर), निता ठाकूर (नेरूळ), संगम्मा रूदवडे (वाशी), वंदना गायकवाड (तुर्भे), नमिता विभे (कोपरखैरणे), बारकुबाई मढवी(घणसोली), जयश्री पाटील (ऐरोली), सिताबाई जाधव(दिघा) या महिला स्वच्छतासखींना उत्कृष्ट महिला स्वच्छताकम म्हणून सन्मानीत करण्यात आले.
महिलांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित कलागुणदर्शनपर स्पर्धांना उत्साही प्रतिसाद लाभला होता. त्यामध्ये समुह गायन स्पर्धेत रूचिरा गानसमुह ऐरोली यांनी तसेच समुह नृत्य स्पर्धेत डान्सींग दिवाज सानपाडा यांनी सर्वप्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. समुह नाटिका स्पर्धेत नेरूळ येथील पंचशील सामाजिक संस्था समुह आणि महिला भजन मंडळ स्पर्धेत विठ्ठल रूक्मिणी महिला भजन मंडळ कोपरखैरणे यांनी प्रथम क्रमांकाचा बहुमान संपादन केला. मंगळागौर स्पर्धेत वाशीचा राजा महिला समुह प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या प्रत्येक पाचही स्पर्धांतील विजेत्यांस अनुक्रमे 3 व उत्तेजनार्थ पारितोषिके रोख व सन्मानचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात आली. यावेळी सर्वच स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांनी उत्साहात आपले सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अखेरीस लकी ड्रॉ काढून प्रत्येक विभागातील भाग्यवान विजेत्या महिलेला पैठणी प्रदान करण्यात आली. जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम हाऊसफुल्ल गदत जल्लोषात संपन्न झाला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai