सिडकोची कामगिरी जागतिक दर्जाची
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2025
- 240
विजय सिंघल यांचे गौरवोद्गार ; 55 वर्षाच्या वाटचालीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान
नवी मुंबई ः सिडको महामंडळाची नगर नियोजन व विकास क्षेत्रातील कामगिरी ही जागतिक दर्जाची असून नवी मुंबईसारखे सुनियोजित शहर विकसित करण्याचे श्रेय सिडकोतील सर्व आजी-माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आहे, असे विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी काढले. सिडको भवन येथे 17 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सिडकोच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी बोलताना विजय सिंघल यांनी सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिडकोच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतामध्ये श्री. विजय सिंघल यांनी सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, महागृहनिर्माण योजना व अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला. या प्रकल्पांमुळे नवी मुंबईसह राज्याच्या आर्थिक विकासाकरिता चालना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार असल्याची माहिती विजय सिंघल यांनी दिली.
या वषच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये पहिल्यांदाच सहभागी होऊन सिडकोने सामंजस्य करार करून नवी मुंबईमध्ये इंटरनॅशनल एज्युसिटी आणि एन्टरटेनमेन्ट अरीना या प्रकल्पांचे सामंजस्य करार केल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारचे देशातील हे पहिलेच प्रकल्प आहेत. नवी मुंबईसह भविष्यातील नैना शहराची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोंढाणे धरणाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विजय सिंघल यांनी सांगितले.
सिडकोच्या नगर नियोजनातील कामगिरीमुळे सिडकोने देशाबाहेरही ओळख निर्माण केली असून सिडकोमध्ये काम करणे ही येथील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, असे मतही विजय सिंघल यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, प्रमदा बिडवे, प्र. व्यवस्थापक (कार्मिक), सिडको, नरेंद्र हिरे, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन, नितीन कांबळे, सरचिटणीस, सिडको एम्प्लॉईज युनियन यांसह सिडकोतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. राजा दयानिधी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सिडकोच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन नगर विकास प्रकल्प राबविताना देशातील अन्य राज्ये सिडकोचे प्रारुप (मॉडेल) अनुसरत असल्याचे सांगितले. तसेच यापुढेही सिडकोची यशस्वी वाटचाल सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई शहर विकसित करण्याच्या उद्देशाने 17 मार्च 1970 रोजी महाराष्ट्र शासनाने सिडकोची स्थापना केली होती. आपल्या पाच दशकांहून अधिकच्या कारकीदमध्ये सिडकोने नगर विकासामध्ये आदर्श ठरणाऱ्या अनेक प्रकल्पांची निर्मिती केली आहे. वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून झाली. यानंतर रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रमदा बिडवे यांनी प्रास्ताविक करून सिडकोच्या कारकीदचा संक्षिप्त आढावा घेतला. या प्रसंगी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या सिडकोतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai