थकीत पाणी देयकांसाठी अभय योजना
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2025
- 314
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी देयके थकीत असलेल्या ग्राहकांकडील थकीत पाणी देयक वसुलीकरिता सर्व प्रकारच्या पाणी देयक ग्राहकांसाठी विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50% सूट / सवलत देण्याबाबतची अभय योजना दि. 21 मार्च 2025 ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीकरीता लागू करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे थकीत पाणी देयक ग्राहक तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील थकीत पाणी देयक ग्राहक यांना थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50% सूट / सवलत ही दि. 21 मार्च ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीपर्यंत देण्यात येत आहे.
तरी, या अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले थकीत पाणी देयक दि. 31 मार्च 2025 पर्यंत भरणा करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai