सीए विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन परिसंवाद
- by Aajchi Navi Mumbai
- May 26, 2025
- 369
नवी मुंबई ः वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन मार्फत विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणिव करून देण्याच्या उद्देशाने नुकतेच नवी मुंबईमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसंवादात उपस्थित सनदी लेखापाल यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिलची विद्यार्थी शाखा आहे. यामध्ये सीए विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, सामायिक करण्यासाठी, सहभागी होण्यासाठी आणि कामगिरी करण्यासाठी एक व्यासपीठ दिले जाते. या शाखेमार्फत नवी मुंबईत दि.10 मे 2025 रोजी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणिव करून देण्याचे उद्दिष्ठ ठेवून अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंट्स स्टुडंट असोसिएशन, नवी मुंबई शाखेतर्फे अध्यक्षा सनदी लेखापाल प्रग्या जैन या उपस्थित होत्या. तर इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया, पश्चिम विभाग, वाशी शाखेकडून उपाध्यक्ष सनदी लेखापाल राजेंद्र फडके, खजिनदार सीए जोमन वग्रिस, कमिटी सदस्य सीए दिप्ति जैन उपस्थित होते. यावेळी सीए श्वेता जैन पाटील यांनी नैतिकता, योग्य आचरण आणि नितीमुल्ये तसेच प्रिया सरोदे यांनी कार्यालतील प्रामाणिकपणा या विषयांवर विद्यार्थी सदस्यांना मार्गदर्शन केले. विकासा कमिटीने कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन केले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे अनेक गोष्टींविषयी आकलन झाले शिवाय वैयक्तिक नेटवर्क कसे वाढवायचे, सामाजिक वर्तुळ कशापद्धतीने तयार केले पाहिजे, नेतृत्व कौशल्य वाढविण्यासोबतच समाजाप्रती असणाऱ्या जबाबदारीची जाणिव झाल्याने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai