9 मार्चला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार याद्या
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2020
- 609
नवी मुंबई : एप्रिल मध्ये होणार्या पालिका निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची नावे गृहित धरण्यात येणार आहेत. त्या आधारावर तयार करण्यात येणार्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 9 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
विधानसभा मतदारसंघाच्या 31 जानेवारी 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तर नाशिक, धुळे, परभणी व ठाणे या चार महानगरपालिकांतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 9 मार्च 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या प्रारूप मतदान याद्यांवर 16 मार्च 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या अनुक्रमे 23 व 24 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या 26 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. नाशिक महानगरपालिकेच्या 4अ, धुळे महानगरपालिकेच्या 5ब, परभणी महानगरपालिकेच्या 11ब आणि ठाणे महानगरपालिकेच्या 30अ या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील या मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai