दीड दिवसांच्या 10146 श्रीगणेशमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2025
- 145
नवी मुंबई ः ‘पर्यावरणशील प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव 2025’ साजरा करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत महानगरपालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमधील उत्तम प्रतिसाद दिला. 27 ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सव कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 143 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा एकूण 165 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10146 श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, चोख व्यवस्था ठेवली होती. विसर्जनाची सुव्यवस्था पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त करीत महानगरपालिकेची प्रशंसा केली. त्यास अनुसरुन 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 6663 घरगुती तसेच 4 सार्वजनिक मंडळांच्या 6667 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 143 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 3479 घरगुती श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 10142 घरगुती व 4 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10146 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 3044 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस विभाग व वाहतुक पोलीस विभाग कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने दक्षतेने कार्यरत होती. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 165 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10146 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
6 फूटांखालील श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्यावर भर देण्यात आला. संपूर्ण पालिका क्षेत्रात 143 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याला पर्यावरणशील दृष्टीकोन जपणाऱ्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करीत पर्यावरणशील दृष्टीकोन जपल्याचे दीड दिवसांच्या विसर्जनप्रसंगी दिसून आले. 3044 शाडूच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या पर्यावरणप्रेमी नागरिकांचा आकर्षक कापडी पिशव्या देऊन विशेष सन्मान करण्यात आला. दीड दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये 14 टन 205 किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे तुर्भे येथील प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्याचे पावित्र्य राखून त्योग्य विल्हेवाट लावण्या आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai