पालिकेतील नोकरभरतीच्या निकालाला न्यायालयाची स्थगिती
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 188
नवी मुंबई : काही महिन्यांपूर्वी महापालिकेने 620 पदांसाठी भरती आयोजित केली होती. त्यासाठी परिक्षाही घेण्यात आली. मात्र आता या नोकरभरतीचा निकाल जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी भरतीविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. महापालिकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल पुढील सूचना मिळेपर्यंत जाहीर करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी अपेक्षित आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत आधीपासूनच 73 कर्मचारी ठोक मानधनावर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. डिसेंबर 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांचा विचार करायला सांगितला होता. पण, ज्या कर्मचाऱ्यांची जाहिरात आणि मुलाखत झाली नाही, त्यांना सेवेत घेऊ नये, असे शासनाच्या 2006 च्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने या परिपत्रकाचा आधार घेतला.
महापालिकेतील 668 पदांसाठी 16, 17, 18 आणि 19 जुलै 2025 रोजी परीक्षा झाली. यासाठी 84,774 अर्ज आले होते. उमेदवारांना सोपे जावे म्हणून 12 जिल्ह्यांमध्ये 28 परीक्षा केंद्रे होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेमधील 48 पंप ऑपरेटरला कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांचा 2006 पासून न्यायालयीन लढा सुरू होता. औद्योगिक न्यायालयाने आधी निर्णय दिला होता, ज्याला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने महापालिकेला यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेविरोधात महापालिकेत कार्यरत असलेल्या करारपद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेस नोकर भरतीचा निकाल (स्कोर बोर्ड) तूर्तास जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी येत्या 23 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai