महाआरोग्य शिबिराचा 658 नागरिकांंनी घेतला लाभ
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 23, 2025
- 150
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरु असलेल्या सेवा पंधरवडा निमित्त वाशी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला 658 नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एम.जी.एम हॉस्पिटल वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि भाजपा बेलापुर विधानसभा संयोजक निलेश विजय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, विकास सोरटे मंडळ अध्यक्ष यांच्या नियोजनात वाशी सेक्टर - 9 येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत ‘मोफत महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत महाआरोग्य शिबिराला 658 नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभला. तसेच एम.जी.एम हॉस्पिटल वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये बॉडी मास इंडेक्स, रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, फ्री डॉक्टर कन्सल्टेशन, ईसीजी, दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत औषधे, डाबर च्यवनप्राश व मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
वाशी येथील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी, हा या मागचा उद्देश असून आज मोठ्या संख्येने सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व तरुणांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी बेलापूर विधानसभा संयोजक व माजी नगरसेवक श्री. निलेश म्हात्रे यांच्या समवेत तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, भाजपा प्रवक्ता तथा माजी नगरसेवक राजू शिंदे, वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, भरत मावळे, माजी वाशी मंडळ अध्यक्ष मंगेश चव्हाण, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, महेश दरेकर, प्रवीण भगत, सुमा रंजीत, जयंत पाटील, क्षितिजा घोरपडे, मालती सोनी, प्रमिला खडसे वाशी विभागातील सोसायटींचे पदाधिकारी व असंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai