शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या लढती
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2025
- 82
नवी मुंबई ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्या सहकार्याने, नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिस मुख्यालय, रोडपाली, कळंबोली येथील सुसज्ज अशा कुस्ती प्रशिक्षण केंद्रात नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय ‘कुस्ती’ स्पर्धा 2025-26 विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागातून कुस्ती मॅटवर यशस्वी रितीने झाल्या. या स्पर्धेत नवी मुंबईतील विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून 14,17 व 19 वर्षाआतील 105 मुले व 49 मुली असे एकुण 154 खेळाडू सहभागी झाले होते. ऑलम्पिक स्तरावर खेळला जाणाऱ्या कुस्ती खेळात आता नवी मुंबई शहरातील खेळाडूंचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
फ्री स्टाईल प्रकारात मुलांच्या 14 वर्षाआतील वयोगटामध्ये 35 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - रणवीर संतोष जाधव, नमुंमपा शाळा क्र. 36 कोपरखैरणे, 38 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - संजय बबन शिंदे, नमुंमपा शाळा क्र. 31 कोपरखैरणे, 41 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - ओमकार अनिल पाटोळे, न्यु बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, 44 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- प्रशांत निलेश पाईकराव, नमु़ंमपा शाळा क्र. 36 कोपरखैरणे, 48 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - वेदांत विलास साळवी, नमुंमपा शाळा क्रमांक 09 नेरुळ, 52 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - तस्मय थोरात, रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा, 57 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - जोतीराम शंकर पाटील, न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, 62 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - रोनक राजकुमार विश्वकर्मा, न्यु बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, 68 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - आयुष ज्ञानदेव गोसावी, ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणे यांनी पटकावला.
14 वर्षाआतील मुलींच्या 33 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - ओमी प्रदीप गायकवाड, डी.आर.पाटील विद्यालय तुर्भे, 36 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - संशिखा महावीर शर्मा, नमुंमपा शाळा क्र.74 कोपरखैरणे, 39 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- उर्वी उमेश माने, जयपुरीयार स्कूल सानपाडा, 42 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - शबाना शबीर शेख, नमुंमपा शाळा क्र.36 कोपरखैरणे, 46 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - तिथी थोरात, रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा, 50 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - सरस्वती राजू चिन्नीराठोड, नमुंमपा शाळा क्र.122 कोपरखैरणे, 54 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- पूर्वा विजय पवार, नमुंमपा शाळा क्र.36 कोपरखैरणे, 62 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - स्मरणिका राहुल बनसोडे, भारती विद्यापीठ सीबीडी बेलापूर यांनी संपादन केला.
19 वर्षाखालील मुलींच्या गटात 59 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - संस्कृती झायगुडे, सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोली हीने मिळविला. ग्रीको रोमन स्टाईल 17 वर्षाआतील मुलांच्या गटात 51 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - सार्थक धनावडे, ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणे, 60 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक - सागर नरळे, विद्याभवन हायस्कुल नेरुळ, 65 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक- श्लोक पाटील, वेस्टर्न कॉलेज सानपाडा यांनी पटकाविला.
19 वर्षाखालील मुलांच्या गटात 79 किलो खालील वजनी गटात अथर्व तानाजी जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या नमुंमपा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नवी मुंबई शहरातील खेळाडूंनी यश संपादन केले असून पुढील मुंबई विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ते पात्र ठरलेले आहेत. या स्पर्धा आयोजनासाठी पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) यांचेकडून कुस्ती हॉल व मॅट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. स्पर्धा आयोजनामध्ये ठाणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे पंच श्रीराम पाटील, सतिश म्हात्रे, नवी मुंबई कुस्ती संघाचे पदाधिकारी दत्तात्रय डुबे, धनंजय माने, संदीप दळवी तसेच एनआयएस कोच संपत्ती मधुकर येळकर, क्रीडा प्रमुख व नवी मुंबई पोलीस यांची संपूर्ण तांत्रिक मदत मिळाल्याने स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai