नशामुक्ती रॅलीचे भव्य आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2025
- 99
नवी मुंबई ः एस आय इ एस कॉलेज, नेरुळ, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, नेरुळ पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एस आय इ एस कॉलेजपासून नेरुळ स्टेशनपर्यंत नशामुक्ती रॅली 24 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आली. या कॉलेजच्या एनएसएसचे दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात व्यसनविरोधी फलक आणि नशा नही रोजगार दो, युवाओंको संस्कार दो, ‘जागो जागो नौजवान, नशा छोडो बनो महान या व्यसनविरोधी घोषणांनी नेरुळ परिसर दणाणून गेला होता. नेरूळ स्टेशनच्या परिसरात रॅली थांबल्यानंतर एक सुंदर, जोशपूर्ण पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. ते पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. या रॅलीत प्रा. कामिनी ठाकूर, योगेंद्र दळवी, तनिश हजारी हे एनएसएस अधिकारी, अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ अजित मगदूम, मुक्ता महापात्रा, मल्लिका सुधाकर, वसंत वळकुंडे, मनीषा वळकुंडे, जालिंदर यमगर नेरूळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पो.नि. पंकज घाडगे, पो. नि. संजय लाड इत्यादी सहभागी झाले होते. या संपूर्ण उपक्रमाचे नेटके नियोजन विद्यार्थी उपक्रम प्रमुख सिद्धी पडियाची हिने केले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai