नवी मुंबईत मराठी रंगभूमी दिन उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 05, 2025
- 378
नवी मुंबई : 5 नोव्हेंबर म्हणजेच ‘मराठी रंगभूमी दिवस’. हा दिवस प्रत्येक कलाकारासाठी सणाचा दिवस. यानिमित्ताने नवी मुंबईतील कलाकरांनी एकत्र येऊन वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन ‘मराठी रंगभूमी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी एकपात्री अभिनय, गीत गायन, नाट्यछटा, मनोगत सादर करण्यात आली. त्याला विशेष दादही मिळाली.
मराठी रंगभूमीला आज जवळपास 170 वर्षांच्या परंपरेचे बळ लाभले आहे. 1843 साली सांगलीत विष्णुदास भावे यांनी केलेल्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकानं जणू मराठी रंगभूमीचा जन्मच झाला. त्या पहिल्या प्रयोगातच प्रेक्षकांनी मराठी नाटकाला अक्षरश: डोक्यावर घेतले. विष्णुदास भावे यांनी केवळ नाटक रचलं नाही, तर मराठी मनात नाट्यसंवेदना जागवल्या. म्हणूनच त्यांना मराठी रंगभूमीचे जनक मानलं जातं. विष्णुदास भावेंनी पेटवलेला रंगभूमीचा दिवा आजही तेजाने उजळत आहे. आजही कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं रंगभूमीवरील प्रेम कमी झालेले नाही. ही कला, संस्कृती जपण्याचा प्रयत्न नवी मुंबईत होत आहे. येथील नाट्यकर्मी, कलावंत, लेखक, कवी, नृत्यकार, अभिनेते यांच्यासह बालकलाकारही या क्षेत्राला नवी मुंबईतून नवं रुप मिळाव आणि मराठी रंगभूमीचा नवा इतिहास रचला जावा यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभुमीवर बुधवारी मराठी रंगभूमी दिवस भावे नाट्यगृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. 50 हुन अधिक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी पवळे यांनी केले. नवी मुंबईतील रंगभूमी विषयी पुढील काळातील नियोजन काय असणार आहे याचा आढावा सुनील पगार यांनी घेतला. यावेळी नटराज पूजन ठाणे लोकसभा खासदार.डॉ.संजीव नाईक यांनी केले करुन भविष्यात नवी मुंबईतील कलाकारांसोबत आम्ही आहोत अशी ग्वाही दिली. तसेच नवी मुंबईतील कलाक्षेत्रात मोठे कार्यक्रम संमेलन व्हावी व नवी मुंबईतील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे अशी भावना व्यक्त केली. तसेच येणाऱ्या काळात पालिका आणि प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कलाकारांना कसा फायदा होईल याबाबत निश्चितच पाठपुरावा करू असे आश्वासितही केले.
याप्रसंगी, जेष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे, अशोक पालवे, नितीन गुरव, शशी तुपे, सचिन तडाखे, वासंती भगत, मुकुंद महाले, सिद्धार्थ ठोकळे, देवा सरकटे, महेश शेळके, सुनील सावंत, सुचिता खाडे, यश आर्या, योगेश कांबळी, विलास गायकवाड, आरती पानसरे, अश्मीक कामठे, क्षमा वराडकर, बडगुजर सर, रंगराव घागरे, संदेश बोबडे, हर्षल राणे, दिलीप जांभळे, जितेंद्र लाड, वैभव वऱ्हाडी, रवींद्र पाटील, सुनील पगार, बालकलाकार जय आंब्रे, आदी रंगकर्मी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai