महावितरणला स्मार्ट मीटर कामगिरीमुळे ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 27, 2026
- 29
मुंबई : 26 फेब्रुवारी 2026 सर्वाधकि अत्याधुनकि स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महावितरणचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने मुंबई येथे बुधवारी (25 फेब्रुवारी) गौरव करण्यात आला. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात 92.7 बिग एफएम या लोकप्रिय रेडिओ चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रात कल्पकता व नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे 88.50 लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या या यशात महावितरणची कामगिरी प्रमुख आहे. शंभर टक्के अचूक बिल, ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर समजण्याची सुविधा, सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रती युनिट 80 पैसे टीओडी सवलतही देण्यात येत आहे. तसेच औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठी वीजदरात सवलत देण्यात येत आहे.
राज्यात 9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात आला. यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरच्या लाभांबाबत राज्यभरात जनजागृती करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai