सट्टा बाजारात दोघांना 1 कोटींचा गंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 27
नवी मुंबई : सोशल मिडीयावरील जाहीरातींना भूलुन गुंतवणूक केल्यावर फसगत झाल्याची अनेक उदाहरणे समोर असतानाही नागरिक यामध्ये फसले जात असल्याच्या घटना घडतच आहेत. असाच अनोळखी व्यक्तीवर टाकलेला विश्वास दोन जणांना महागात पडला आहे. दोन्ही फिर्यादी ऐरोली येथे राहत असून तीन महिन्यात त्यांची 1 कोटी 3 लाख 5 हजार 837 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यांना बीट कॉइन, क्रिप्टो करन्सी सट्टा बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.
ऐरोली येथे राहणारे तेजस गोडांबे यांचा समाज माध्यमाद्वारे संशयित आरोपींचा संपर्क आला होता. त्यांनी सट्टा बाजारात गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या अमिषाला बळी पडत गोडांबे यांनी 12 जानेवारी ते 6 मार्च दरम्यान एकूण 56 लाख 61 हजार 837 रुपये गुंतवले होते. हे पैसे त्यांनी संशयित आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यात वर्ग केले होते. मात्र अनेक महिने होऊनही परतावा तर दूरच मूळ रक्कम हि अनेकदा मागून मिळाली नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची तात्काळ शहानिशा करून सायबर पोलिसांनी चार संशयित आरोपींच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. ऐरोली येथे राहणारे सत्यनारायण दास आणि संशयित आरोपी यांचा संपर्क समाज माध्यमातून आला होता. यात तीन वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधून संशयित आरोपींनी त्यांना बिटकॉइन चलन , क्रिप्टो करन्सी आणि ऑनलाईन सट्टा बाजार मधून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या कडून तब्बल 46 लाख 44 हजार एवढी रक्कम घेण्यात आली. हि रक्कम सत्यनारायण यांनी ऑनलाईन पद्धतीने संशयीत आरोपींनी दिलेल्या खाते क्रमांकावर वर्ग केली होती. हा सर्व प्रकार 14 सप्टेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 दरम्यान घडला होता. मात्र गुंतवणूक केलेली रक्कम आणि परतावा दोन्ही मिळणार नसल्याची खात्री पटल्यावर सत्यनारायण यांनी रबाळे पोलीस ठाण्यात संशयित आरोपींच्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.
समाज माध्यमात गुंतवणुकीवर अल्पवधीत चौपट पाच पट परतावा मिळेल अशी जाहिरात केली जाते. त्या जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करताच तुमचा समावेश एखाद्या व्हाट्सअप समूहात केला जातो. त्या ठिकाणी अनेक जण त्यांना भरघोस नफा कसा मिळाला याची चर्चा केली जाते. येथेच बळी पडून फिर्यादी पैसे गुंतवत राहतो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai