सोनसाखळी चोरी
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 24
पनवेल : पनवेल परिसरात चोरांकडून पादचारी महिलांना लक्ष्य केले जात आहे. खांदेश्वर वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर सेक्टर 1 येथून बँक कर्मचारी महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरांनी धूम ठोकली. ही घटना 27 मार्चला रात्री नऊ वाजता घडली. याबाबत महिलेने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बँक कर्मचारी असलेली ही महिला महिनाअखेर असल्याने उशिरा कार्यालयातून परतत होती. खांदेश्वर रेल्वे स्थानकातून त्या सेक्टर 1 येथून पायी चालत असताना अचानक एका दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पनवेलच्या दिशेने पोबारा केला. या घटनेनंतर भेदरलेल्या बँक कर्मचारी महिलेने जोरदार आरडाओरड केली. चोरी करताना पीडितेला हिसका मारल्यानंतर साखळीमधील पेंडेंट रस्त्यावर शोधाशोध केल्यावर सापडले. मात्र या सर्व झटापटीत 10 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरीस गेली. फेब्रुवारी महिन्यात तीन महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र चोरांना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश मिळालेले नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai