एनएमएमटीचा 96.97 कोटींचा अर्थसंकल्प
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 22
नवी मुंबई : शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यावर भर देत नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचा 2026-27 वर्षासाठी 96.97 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी महासभेत सादर करण्यात आला. एक लाख वृक्ष लागवड, बोटॅनिकल गार्डन उभारणी आणि रस्त्यालगतच्या वृक्षांचे पुनरुज्जीवन यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अन्वये वृक्ष प्राधिकरणाचे 25 वे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सन 2025-26 च्या सुधारित अंदाजानुसार 74.32 कोटी जमा व 6.02 कोटी खर्चानंतर शिल्लक राहणार आहे. तर 2026-27 साठी 68.29 कोटी आरंभीची शिल्लक धरून एकूण 96.97 कोटी उत्पन्न अपेक्षित असून 58.17 कोटी खर्चानंतर 38.80 कोटी शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. हरित आच्छादन वाढवण्यासाठी आगामी वर्षात 1 लाख वृक्ष लागवडीसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोपरखैरणे येथे बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी 8 कोटी, तसेच प्रत्येक विभागात आधुनिक रोपवाटिका विकसित करण्यासाठी 1.25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.रस्त्यांवरील डिव्हायडर व रस्त्यालगतच्या वृक्षांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असून, यासाठी 13.60 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या अंतर्गत वृक्षांची देखभाल, छाटणी, नवीन लागवड, माती सुधारणा आणि स्वयंचलित पाणीपुरवठा प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील हरित पट्टा बळकट होऊन प्रदूषण नियंत्रणास मदत होणार आहे. वृक्षतोड आणि स्थलांतर प्रक्रियेसाठी सीएसआरच्या माध्यमातून ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाणार असून, वृक्ष छाटणीसाठी विशेष वाहन खरेदीसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय हरित प्रभाग स्पर्धा, पर्यावरण जनजागृती, कार्यशाळा आणि प्रशिक्षण उपक्रमांद्वारे नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. फ्लोटिंग गार्डन, रूफटॉप आणि व्हर्टिकल गार्डनसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहराचे सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन अधिक मजबूत करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष अशोक पाटील यांनी महासभेत स्पष्ट केले.
- शहरात 197 उद्याने
‘उद्यानांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत सध्या 197 उद्याने आणि 252 मोकळ्या जागा आहेत. सुमारे 17 लाख चौरस मीटर क्षेत्रातील हरित पट्ट्याची देखभाल वृक्ष प्राधिकरणामार्फत केली जाते. शहरात 216 प्रजातींचे सुमारे 15.28 लाख वृक्ष नोंदविण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai