एनएमएमटीचा विकास आणि विस्तार होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 24
परिवहनचा 652 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प
नवी मुंबई ः महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा 2026-27 वर्षासाठी 652 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी महासभेत सादर करण्यात आला. पर्यावरणपूरक बस ताफा वाढवणे, चार्जिंग सुविधा उभारणे आणि नवीन बसमार्ग सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलन 98 ब अन्वये ‘अर्थसंकल्प ब’ महासभेत मांडण्यात आला.
सन 2025-26 च्या सुधारित अंदाजानुसार 467.25 कोटी रुपयांच्या उत्पन्नातून 467.15 कोटी खर्च वजा जाता सुमारे 9.55 लाख रुपयांची शिल्लक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर 2026-27 साठी आरंभीची 9.55 लाख शिल्लक धरून एकूण 652 कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून 651.90 कोटी खर्चानंतर वर्षअखेरीस सुमारे 9.35 लाख शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात पर्यावरणपुरक बस ताफा विस्तार, व्यावसायिक तत्वावर बस टम्रिनसचा विकास , सौरऊर्जा पज्ञ्रकल्पाद्वारे वीज खतर्चात बचत, सार्वजनिक वाहनांकरिता चार्जींग सुविधा, नवीन बस मार्ग , बस टर्मिनस वाणिज्य संकुल, अद्यायवत आयटीएमएस प्रणाली या सेवआंचा समावेश करण्यात आला आहे. जुन्या कालबाह्य बसेस निर्लेखीत करुन सध्या 150 सीएनजी बसेस व पुढील आर्थिक वर्षात नवीन 100 पर्यावरण पुरक सीएनजी, विद्युत बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत 100 इलेक्ट्रिक बससाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक वाहनांसाठी पीपीपी तत्वावर 10 ठिकाणी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच परिवहन उपक्रमाच्या आगार व बस टर्मिनस येथे सौरऊर्जा प्रकल्प राबवून वीज खर्चात बचत करण्याचे नियोजन आहे. उत्पन्न वाढीसाठी बस टर्मिनसचे व्यावसायिक विकासावरही भर देण्यात आला आहे. वाशी सेक्टर 9 आणि सेक्टर 12 येथील बस टर्मिनस वाणिज्य संकुल भाडेतत्वावर देऊन वाहतूकबाह्य उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याशिवाय, नवीन विमानतळ आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगर क्षेत्रात बससेवेचा विस्तार केला जाणार असून, अधिक उत्पन्न देणारे नवीन बसमार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी अद्ययावत ‘आयटीएमएस’ प्रणालीचा वापर करून बससेवा अधिक वेळेवर आणि कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai