वाशीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 24
2.50 लाखांचे 132 सिलेंडर जप्त
नवी मुंबई : आखाती युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा भासत आहे. सरकारने खबरदारी म्हणून व्यवसायिक गॅस सिलेंडर वर कडक निर्बंध घातले आहेत. तर घरगुती गॅस मिळण्यास उशीर होत आहे. मात्र हे नियम काळाबाजार करणाऱ्यांच्या पथ्यावर पडले आहे. याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा किमतीने गॅस सिलेंडरची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून 132 सिलेंडर जप्त केले असून हे सिलेंडर ज्या गाड्यातून वहन केले जात होते त्या चार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अमेरिका इस्रायल यांनी इराण युद्धामुळे गॅस आणि इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात दोन आठवड्यापासून काही देशांच्या गॅस आणि इंधन वाहतुकीस परवानगी दिली गेल्याने भारतात गॅस पुरवठा थोडा फार होत आहे. देशातील गॅस पुरवठा पूर्ववत होईपर्यंत सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. व्यवसायिक सिलेंडरला मर्यादा आली असून येत्या काळात ज्या ठिकाणी नैसर्गिक वायू देणे शक्य आहे. त्या ठिकाणी सिलेंडर पुरवठा केला जाणार नाही याचे सूतोवाच केले आहे. एकीकडे सरकार अशा उपायोजना करत असताना जादाचे पैसे मोजले कि सिलेंडर मिळत असल्याने काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. नवी मुंबईत असा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी वाशी पोलिसांनी इरफान शेख आणि फिरोज टिटोना या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई 1 एप्रिल (मंगळवारी) करण्यात आली. अनधिकृत रित्या सिलेंडर वितरित होत असल्याची माहिती मिळताच जुहू गाव येथील गावदेवी मैदानात पोलिसांनी धाड टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या कडून 80 रिकामे 52 भरलेले सिलेंडर जप्त केले .गॅस भरलेले सिलेंडरची किंमत 2 लाख 38 हजार 922 असून 34 हजार 400 रुपयांचे रिकामे सिलेंडर असे एकूण 2 लाख 73 हजार 322 रुपयांचे सिलेंडर या व्यतिरिक्त 9 लाख 70 हजार रुपयांच्या चार गाड्या अशा प्रकारे एकूण 12 लाख 43 हजार 322 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 नुसार गुन्हा नोंद केला आहे. सध्या दोन संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी हि साखळी असू शकते. यात अजून कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai