डेंगूच्या साथीने नागरिक हैराण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2026
- 26
उरण ः कोप्रोली पाणदिवें गावात डेंग्यूची साथ मोठ्या झपाट्याने पसरत आहे. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्क्रिय कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर सेवा न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
उरण तालुक्यातील कोप्रोली पाणदिवें गावात डेंग्यूचे 25 ते 30 रुग्ण सापडले असून संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रामार्फत फक्त पहाणी व फवारणी केली आहे. पण डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना नसल्याने रुग्णांची संख्या वाढतच आहेत. आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर सेवा न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, अनेक वेळा आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसतात. त्यामुळे लहानसहान आजारांसाठीही रुग्णांना उरण किंवा पनवेल येथील मोठ्या रुग्णालयात जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव, अपुरी साधनसामग्री आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले की, तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. दरम्यान, नागरिकांनी संबंधित आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, तसेच आवश्यक औषधे व सुविधा तत्काळ उपलब्ध कराव्यात, डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करणे गरजेचे असून, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ मंडळ पाणदिवे यांच्यामार्फत देण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai