एचपीव्ही लसीकरणास गती देण्याचे आयुक्तांचे आदेश
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2026
- 50
पनवेल ः 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण करणे अनिवार्य असून या लसीकरणास 8 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या लसीकरण मोहिमेची आढावा बैठक मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्तांनी या लसीकरण मोहिमेस पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात गती देण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना पालिकेच्यावतीने राबविल्या जाव्यात अशा सूचना उपस्थितांना दिल्या.
यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी ,शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, माता व बालसंगेापन अधिकारी डॉ. गणेश नायर, डॉ. उषा राठोड, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.पाटोदकर, श्री सत्यसाई संजिवनी रूग्णालयाचे डॉ. ऋषीकेश वडके, आशा सेविका उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2026 रोजी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ करण्यात आला आहे. याअनुषंगाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे. पुढील महिन्याच्या कालावधीत 14 वर्ष पूर्ण होणाऱ्या मुली एचपीव्ही लसीकरण मोहिमेत लसीकरणास पात्र राहतील. हे लसीकरण पूर्णत: मोफत असणार आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरणास महापालिका कार्यक्षेत्रात सुरुवात झाली आहे. महापालिका क्षेत्रातील एकुण 7 हजार 779 मुलींचे लसीकरण या मोहिमेमध्ये अपेक्षित आहेत. या लसीकरणामुळे महिलांमध्ये संभाव्य गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होणार आहे,त्यामुळे नागरिकांनी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता नमुद वयोगटातील मुलींचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. पालिकेच्या 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 यावेळेत केले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai