504 इमारती धोकादायक
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 18
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2026-2027 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 504 इमारती या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अतिधोकादायक म्हणजे ‘सी-1’ प्रवर्गामध्ये मोडणऱ्या 52 इमारती आहेत.
पालिकेने जाहीर केलेल्या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-1’ प्रवर्गामध्ये मोडणा-या 52 इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 ए’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या 102 इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 बी’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या 297 इमारती त्याचप्रमाणे इमारतीची किरकोळ दुरूस्ती या ‘सी-3’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या 53 इमारती, अशाप्रकारे एकूण 504 धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे. ही यादी नवी मुंबई महापालिकेच्या या वेबसाईटवर विभाग सेक्शनमध्ये अतिक्रमण विभाग माहितीच्या सेक्शनमध्ये ‘सामान्य माहिती’ या अंतर्गत अवलोकनासाठी सहज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी1’ प्रवर्गामध्ये नमूद 52 इमारतींची नावे व तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 मधील तरतुदीच्या अनुषंगाने नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक, भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी, वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी, वाणिज्य वापर तात्काळ थांबविणेबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांचेकडील दि. 05 नोव्हेंबर 2015 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना, नोटीस देण्यात आलेल्या आहेत. ‘सी-1’ प्रवर्गातील इमारतीची विदयुत व जलजोडणी खंडीत करण्यात येईल असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. अशा धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांनी ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्त हानी होण्याचा संभव लक्षात घेऊन सदर इमारतीचा, बांधकामाचा निवासी, वाणिज्य वापर त्वरित बंद करावा आणि सदरची इमारत, बांधकाम विनाविलंब तोडून टाकावे असे सूचित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, सदर इमारत, बांधकाम कोसळल्यास होणाऱ्या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही असे स्पष्टपणे सूचित करण्यात आलेले आहे.
तरी पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा,घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिवित व वित्तहानी होऊ शकते. म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा, घरांचा रहिवास, वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
- वाशीतील इमारतीमधील पाणी बंद
पालिकेने सी-1 प्रवर्गातील अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहिम हाती घेतली असून गुरुवारी वाशी येथील सेक्टर 9 मधील जय महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था या इमारतीची वीज आणि पाणी जोडणी तोडून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai