सिडको गृहनिर्माण योजनांसंदर्भात अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा
- by Aajchi Navi Mumbai
- May 22, 2026
- 17
नवी मुंबई ः सिडको गृहनिर्माण योजनांसंदर्भात कोणत्याही आमिषांना तसेच मध्यस्थ किंवा प्रतिनिधी असल्याचे भासवणाऱ्या कोणत्याही व्यक्तींना बळी न पडण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. गृहनिर्माण योजनांसंदर्भात सिडकोतर्फे जारी करण्यात येणारी प्रसिद्धी पत्रके, सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ, सिडकोची समाजमाध्यमांवरील अधिकृत खाती यांद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
सिडको महामंडळामार्फत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या गृहनिर्माण प्रकल्पातील रिक्त सदनिकांची विक्री ही केवळ सिडकोद्वारे जाहीर करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनांनुसार करण्यात येते. सद्यस्थितीत ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ व एफसीएफएस या गृहनिर्माण योजना राबविण्यात आलेल्या आहेत. तसेच उर्वरित सदनिकांच्या विक्रीकरिता नवीन गृहनिर्माण योजनेवर काम चालू आहे. तरी इच्छुक अर्जदारांनी सदर योजनांचा लाभ घ्यावा.
सिडकोने बांधलेल्या सदनिका थेट पद्धतीने वाटप करण्याचे सिडकोचे धोरण नाही. तसेच वाटप झालेल्या सदनिकांची संपूर्ण रक्कम सिडकोकडे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच भरणे गरजेचे आहे. सिडको कोणत्याही प्रकारची रक्कम चेक अथवा कॅश पद्धतीने घेत नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. सदनिकांच्या वितरणासाठी किंवा त्यासंबंधित कोणत्याही कामासाठी सिडकोतर्फे कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, त्यांनी अशाप्रकारचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या आमिषाला अथवा प्रलोभनांना बळी पडू नये. सिडको गृहनिर्माण योजनांसंदर्भात सिडकोतर्फे जारी करण्यात येणारी प्रसिद्धी पत्रके, सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ, सिडकोची समाजमाध्यमांवरील अधिकृत खाती यांद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्यास त्यास सिडको जबाबदार राहणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai