पीट एनडीपीएस अंतर्गत नवी मुंबई पोलीसांची कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 29, 2026
- 17
नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कठोर पाऊल उचलत एका सराईत तस्कराला ‘पिट एनडीपीएस’ कायद्यांतर्गत एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासातील ही पहिली, तर महाराष्ट्रातील दुसरी अशी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
‘नशामुक्त भारत 2028’ अभियानांतर्गत गंभीर आणि सातत्याने गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला दिले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजन बाळा राठोड याच्यावर लक्ष केंद्रीत केले. पोलिसांच्या माहितीनुसार, राठोड हा मुंबई परिसरातून नवी मुंबईत येऊन विविध भागांत अंमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्या हालचालींवर काही महिन्यांपासून पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत होती. राठोड याच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय खुनाचा प्रयत्न, मारामारी, दरोडा यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या आणखी पाच गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये असल्याचे तपासात समोर आले. वारंवार कारवाई होऊनही त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये कोणतीही घट दिसून आली नसल्याने पोलिसांनी कठोर कायदेशीर पर्यायाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपीविरोधात ‘पिट एनडीपीएस’ अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आला. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तसेच समाजावर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अहवाल या प्रस्तावासोबत जोडण्यात आला होता. गृह विभागाने प्रस्तावाची छाननी केल्यानंतर त्यास मंजुरी दिली. त्यानंतर पोलिसांनी राठोड याला ताब्यात घेऊन पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai