एनएनएमटी कर्मचाऱ्यांच्या ठोक मानधनात वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 30
7000 रुपयांचे वाढीव वेतन खात्यात जमा
नवी मुंबई ः श्रमिक सेनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवी मुंबई परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या ठोक मानधनांमध्ये थेट 7000 रुपयांची घसघशीत वाढ झाली असून हे वाढीव वेतन त्यांच्या बचत खात्यात जमा देखील झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून एनएमएमटी अंतर्गत चालक, वाहक आणि इतर विविध पदांवर ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पगारवाढीची सातत्याने मागणी होत होती. श्रमिक सेनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होण्यासाठी श्रमिक सेनेकडून यशस्वी प्रयत्न करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन परिवहन प्रशासनाने त्यांच्या मानधनात 7,000 रुपयांची थेट वाढ मंजूर केली आहे. प्रशासनाने वेतन वाढीस मंजुरी दिल्यावर बुधवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वाढीव वेतन जमा झाले. तसेच या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1,000 रुपयांची नियमित वार्षिक वेतनवाढ देखील देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय विम्याची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे सुमारे 1,500 कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 24,000 रुपयांवरून थेट 31,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. या कर्मचाऱ्यांनी जनता दरबारामध्ये जाऊन वनमंत्री नामदार गणेश नाईक यांचे आभार व्यक्त केले. या निर्णयामुळे परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. वेतन वाढीच्या निर्णयामुळे आमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होणार असल्याची भावना ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai