158 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 21
1 लक्ष 55 हजार दंडात्मक रक्कम वसूली
नवी मुंबई ः पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्लास्टिकविषयी जनजागृती करण्याच्या उपक्रमासोबतच एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्यासाठी तपासणी मोहीमांचेही सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने 12 जूनला आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विशेष प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहीमेमध्ये प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापर प्लास्टिकचा उपयोग करताना आढळलेल्या 30 व्यावसायिक आणि आस्थापना यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून 1 लक्ष 55 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तसेच साधारणत: 158 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला.
विशेष मोहिमेमध्ये बेलापूर विभागातून 30 हजार दंडात्मक रक्कम आणि 10 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच नेरूळ विभागातून 10 हजार दंडात्मक रक्कम व 5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिकची जप्ती करण्यात आली. वाशी विभागातून 5 हजार दंडात्मक रक्कम व 5 किलो प्लास्टिक साठा आणि तुर्भे विभागात 8 व्यावसायिक /आस्थापना यांचेकडून 45 हजार दंडात्मक रक्कम तसेच तब्बल 100 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. अशाच प्रकारे कोपरखैरणे विभागातून 20 हजार दंडात्मक वसूली आणि 2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त तसेच घणसोली विभागातून 30 हजार दंडात्मक वसूली आणि 28 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. ऐरोली विभागातूनही 15 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 8 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai