कचरा वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 26
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या अनुषंगाने 15 ते 30 जून 2026 या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्टेशन, सायन पनवेल हायवे, झोपटपट्टी भाग, गाव/गावठाण क्षेत्र, तलाव व खाडी किनारे, सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, स्वच्छता लक्ष्य युनिट अशी दुर्लक्षित क्षेत्रे, बॅक लेन अर्थात घरांच्या किंवा इमारतींच्या मागील बाजूस असलेल्या अरूंद गल्ल््या इ. ठिकाणी व्यापक स्वरूपात विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
त्याचसोबत घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 च्या प्रभावी अंमलबजावणीकरिता घरापासूनच चार प्रकारे कचरा वर्गीकरण करणे तसेच मोठ्या सोसायट्या, संस्था यांनी आपल्या आवारातच दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 8 विभाग कार्यालय क्षेत्रात एजी एन्व्हायरो व परिसर सखी या संस्थांच्या माध्यमातून सोसायट्या आणि संस्था, वाणिज्य संस्था तसेच घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये घरगुती स्तरावर ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी कचरा अशा 4 प्रकारे कचरा वर्गीकरण करणेबाबत तसेच हा वर्गीकृत कचरा कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये वेगवेगळा देणेबाबत माहिती देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, संस्था यांनी आपल्या आवारात कचऱ्याची आपल्यामार्फतच विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने स्वत:च असा प्रकल्प उभारावयाचा आहे याविषयी सूचित करण्यात येत आहे. परिमंडळ 1 क्षेत्रात सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. विविध विभागांतील शौचालयांची अंतर्गत व बाह्य परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. परिमंडळ 2 क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व संस्थाना प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करण्यात आली. यामध्ये गवते वाडी, माईंड स्पेस, चिंचपाडा ऐरोली, ग्रीन वर्ल्ड सोसायटी दिघा अशा विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि सोसायटी व कंपनी मधील संबंधित अधिकारी आणि ऑपरेटर यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर खत प्रकल्प कार्यान्वित ठेवण्यच्या अनुषंगाने यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai