पदभरतीसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 33
20 संवर्गातील 132 पदांकरिता भरती
नवी मुंबई ः महानगरपालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 20 संवर्गातील 132 पदांकरिता एकूण 19,220 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील 6 संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.21 व 22 जुलै 2026 या कालावधीत 6 जिल्ह्यांतील 13 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या नजिकच्या केंद्रावर परीक्षा देता यावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पध्दतीने काटेकोर रितीने व्हावी याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कटाक्षाने लक्ष दिले असून परीक्षा सुव्यवस्थितरित्या पार पाडाव्यात याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे वर्ग 1 श्रेणीचे अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर महानगरपालिकेचे 2 अथवा 3 अधिकारी केंद्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात 1112, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2535, मुंबई जिल्ह्यात 8123, नागपूर जिल्ह्यात 948, नाशिक जिल्ह्यात 1783 व पुणे जिल्ह्यात 4429 अशा प्रकारे 6 जिल्ह्यात एकूण 18,930 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.
सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच परीक्षा प्रणालीतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांना सदर परीक्षेचे प्रवेश पत्र दि.10 जुलै 2026 पासूनच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai