महिलांसाठी 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 24
मुंबई ः महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा राबविण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली. “महिलांच्या प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाने संवेदनशील उत्तरदायी भूमिका बजावावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने (एनसीडब्ल्यू) देशभरातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासाठी आयोजित ‘कॅटलिस्ट फॉर चेंज’ कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. रहाटकर म्हणाल्या, की महिला सुरक्षेबाबत प्रशासनाने तातडीने आणि समन्वयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महिलांच्या कल्याणकारी योजनांचे नियमित लेखापरीक्षण, योजनांचे डिजिटल निरीक्षण, संरक्षण अधिकारी, बालविवाह प्रतिबंध अधिकारी आणि ‘पॉश’ समित्यांच्या वेळेत नियुक्त्या, वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाइन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी, मानव तस्करी प्रतिबंधक पथके, महिलांविरोधातील अत्याचार प्रतिबंध कक्ष आणि समुपदेशन सेवांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली दरमहा बैठका होतील.
‘पोलिस-प्रशासनात समन्वय महत्त्वाचा’ महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रशासन व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासन व पोलिसांमध्ये समन्वय अत्यावश्यक आहे. महिलांशी संबंधित कायदे आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नमूद केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai