तिरंगा रॅलीतून राष्ट्रभक्तीच्या संदेशाचे प्रसारण
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 46
नवी मुंबई ः केंद्र व राज्य शासनाच्या ‘घरोघरी तिरंगा अर्थात हर तिरंगा’ मोहीमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर सुजाता पाटील व उपमहापौर दशरथ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली. ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत कुकशेत येथील नवी मुंबई महानगरपालिका इंग्रजी माध्यम शाळा क्र. 121 मधील विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच शिक्षक आणि नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे नमुंमपा पूर्वप्राथमिक शाळा क्र. 92 मधील चिमुकल्यांनीही बोबड्या बोलात भारतमातेचा जयजयकार केला. महापौर व उपमहापौर महोदयांनी या लहानग्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी ओलू, सुकू, घातकू हे ओला, सुका व घरगुती घातक कच-याची प्रतिकचिन्ह असलेले 3 शुभंकर (मॅस्कॉट) तिरंगा रॅलीचे आकर्षण होते. हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग कार्यालयांमार्फत तसेच शाळाशाळांमध्ये तिरंगा रॅलींचे आयोजन करण्यात येत असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे ‘घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता घरोघरी आरोग्य’ असे अभियान विभागाविभागांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या सर्वच उपक्रमांना उत्साही जनसहभाग लाभत असून आजची नेरूळ विभागातील तिरंगा रॅलीही महापौर व उपमहापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभक्तीचा गजर करीत जल्लोषात संपन्न झाली.
फाळणी भयावहता स्मृतीदिवसानिमित्त प्रदर्शन
नवी मुंबई ः 1947 साली झालेल्या फाळणीदरम्यान भारतीयांनी सोसलेल्या दु:खाची व त्यागाची राष्ट्राला आठवण करून देण्यासाठी तसेच नागरिकांनी केलेल्या संघर्षाच्या व त्यागाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात दि. 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भयावहता स्मृतीदिवस’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त केंद्र व राज्य शासनामार्फत सूचित केल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने निर्मिलेल्या प्रदर्शनाचे आयोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 व 14 ऑगस्ट 2026 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्या वेळेच्या प्रसंगाची व परिस्थितीची माहिती जाणून घेतली. दि. 15 ते 17 ऑगस्ट या कालावधीत महापालिका मुख्यालय, सीबीडी बेलापूर येथे तळमजल्यावर ‘वंदे मातरम’ व ‘तिरंगा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी त्याठिकाणीही भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai