गोकुळाष्टमीपासून पाणीकपात रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 28, 2026
- 32
नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय घेताना मोरबे धरणात 93 टक्के पाणीसाठा असल्याने उत्सव काळात नागरिकांची, विशेषतः महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी गोकुळाष्टमीपासून सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. मात्र पाणीकपात रद्द झाली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
मोरबे धरणातील जलसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने यापूर्वी शहरात पाणीकपात लागू केली होती. धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचेपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करून उपलब्ध पाण्याचा वापर करावा लागत होता. या काळात नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये बदल आणि कपातीचा सामना करावा लागला. आता पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीचे दिवस सुरू होत असल्याने पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः गृहिणींना कपातीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने सणांच्या काळात नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ‘पाणी कपात रद्द केली असली तरी नागरिकांनी पाण्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करावा. वाहन धुणे, परिसराची स्वच्छता किंवा अन्य कामांसाठी शक्य तेथे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पाण्याची बचत करण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून नागरिकांचीही आहे, याकडे महापौरांनी लक्ष वेधले.
मोरबे धरणातील पाणीसाठा सध्या 93 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती महापौरांनी दिली. मात्र, धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने पाणी वापराबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सध्या नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार मोरबे धरणावर असल्याने उपलब्ध साठ्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत हा साठा पुरवण्यासाठी पाण्याचा वापर नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
‘गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळे, गृहनिर्माण सोसायट्या आणि घरगुती गणेशोत्सवांमध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर होण्याची शक्यता आहे. मंडळांनी सजावट, स्वच्छता आणि अन्य कामांमध्ये पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी.लपाणी बचतीचा संदेश सजावटीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन महापौरांतर्फे करण्यात आले आहे. मोरबे धरणातील साठा वाढल्यामुळे पाणी कपातीचा तातडीचा प्रश्न दूर झाला असला तरी भविष्यात पुन्हा पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी बचतीची सवय कायम ठेवणे आवश्यक आहे. पाणी कपात रद्द झाल्याचा दिलासा मिळाला असला तरी ‘पाणी वाचवा’ हा संदेश कायम ठेवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai