प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास नोंदणीची संधी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2026
- 35
दावे-हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत; 10 नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण होणार
नवी मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण 2026 अंतर्गत कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची प्रत्येक पात्र नागरिकाने पडताळणी करावी. नाव नसल्यास विहित प्रक्रियेनुसार अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करून मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
प्रारूप यादीत नाव नसणे म्हणजे संबंधित पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहणार, असा अर्थ होत नाही. नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविली असून, प्राप्त दावे, हरकती आणि नोटिसांवरील कार्यवाही 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
- ऑनलाइन मतदार यादी तपासा
नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर शश्रशलेीींरश्रीशरीलह.शलळ.र्सेीं.ळप तसेच र्ेीींंशीी.शलळ.र्सेीं.ळप किंवा एउखछएढ अझझ वर आपले नाव तपासावे. जन्मतारीख, क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातूनही नाव शोधता येणार आहे. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर मतदार यादी उपलब्ध आहे. तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावरही माहिती घेता येणार आहे. - नाव नसल्यास नमुना 6 भरावा
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक 6, स्वतंत्र घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अथवा संबंधित बीएलओ/ईआरओ कार्यालयामार्फत अर्ज करता येईल. इतर राज्यातून स्थलांतरित झालेल्या पात्र नागरिकांनीही याच पद्धतीने अर्ज करावा. यापूर्वीच्या मध्ये स्वतःची किंवा कुटुंबातील सदस्याची मतदार म्हणून नोंद असल्यास त्याची मॅपिंग माहिती नमूद करावी. मतदार यादीतील नाव किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक 8, तर एखाद्या मतदाराच्या नोंदीवर हरकत घेण्यासाठी किंवा नाव वगळण्याची मागणी करण्यासाठी नमुना क्रमांक 7 वापरावा. अर्ज केल्यानंतर त्याची पोहोचपावती जतन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनाही संधी
1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र युवकांना नमुना क्रमांक 6 भरून मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. - नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरीच कागदपत्रे संकलित
विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान जुळवणी न झालेले किंवा तार्किक विसंगतीअसलेल्या मतदारांना नोटीस मिळाल्यास संबंधित बीएलओ त्यांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारून साईडवर अपलोड करतील. अशा मतदारांना सर्वसाधारणपणे ईआरओ/एईआरओ कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत ईआरओ यांच्या निर्णयानुसार ऑनलाइन सुनावणी घेता येणार आहे. - 3, 4 व 10, 11 ऑक्टोबरला विशेष शिबिरे
दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच 3, 4 आणि 10, 11 ऑक्टोबर 2026 रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास 12 ऑक्टोबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादींचा आढावा
नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत तसेच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून नाव नोंदणीच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले. मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांना भेट देऊन संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात यावी. वाढवून दिलेल्या मुदतीचा, म्हणजेच 12 ऑक्टोबरपूर्वीचा कालावधी प्रभावीपणे वापरून बीएलओंनी गृहभेटींना गती द्यावी, पात्र मतदारांची आवश्यक कागदपत्रे तसेच नवमतदारांसाठी फॉर्म क्रमांक 6 संकलित करण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पात्र नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन क्षेत्रीय पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात 188 पनवेल आणि 190 उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदार यादींच्या सखोल पुनरिक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai